Sunday, June 15, 2025
Homeअर्थविश्व#Good news;-कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ

#Good news;-कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ

३० जून २०२१,
कोरोनामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आई/वडील किंवा दोन्ही पालकांचे निधन झाले असेल, अशा विद्यार्थ्यांचे पदवी वा पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, महाविद्यालय पुस्तिका शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि महोत्सव अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च झालेला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्कही माफ करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी नमूद केले.

विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही. परंतु इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, महाविद्यालय पुस्तिका शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि महोत्सव अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

करोनाच्या झळा सोसणाऱ्या १८ ते २१ वयोगटातील अनाथ मुलांना महिला आणि बाल विकास विभागाने दरमहा २ हजार प्रमाणे तीन महिन्यांचा ६ हजार रुपये भत्ता दिला आहे. राज्यातील २७९ अनाथ तरुणांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. याचा लाभ बालगृहातून बाहेर पडून अनुरक्षण गृहात वास्तव्याला असलेल्या तसेच स्वतंत्रपणे राहणाऱ्या मुलांना मिळत असून त्यांना आर्थिक गरजा भागविण्यासाठी याची मदत होणार आहे.

प्रयोगशाळा, ग्रंथालयासाठी सवलत

प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments