Tuesday, March 18, 2025
Homeउद्योगजगतगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी, 'जीजेसी' चे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी, ‘जीजेसी’ चे मुख्यमंत्र्यांना पत्र

सोने खरेदीच्या पारंपरिक महत्त्वाच्या खरेदी मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा पुढील आठवड्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक स्तरावर टाळेबंदी आणि पर्यायाने व्यापारबंदीचे आलेले निर्बंध हे संपूर्ण देशातील व्यापारावर आणि सोन्याच्या दागिन्यांच्या पुरवठा शृंखलेवर परिणाम करणारे ठरतील, अशी भीती अखिल भारतीय रत्न व आभूषण परिषद (जीजेसी)ने व्यक्त केली आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सराफ बाजारात विक्रीत किमान ३० ते ४० टक्क्याची वाढ होत असते. शिवाय एप्रिलच्या मध्यापासून जूनपर्यंत लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे यानिमित्ताने तरी राज्यात सराफांना विक्री दालने आवश्यक ती खबरदारीच्या सूचनांसह खुली ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी विनवणी जीजेसीचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून केली आहे.

हिरे व्यापाराची सर्वात मोठी बाजारपेठ आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात सोन्याच्या दागिन्यांचा पुरवठा करणारा घाऊक केंद्र असलेला जव्हेरी बाजार मुंबईतच मोडतो. त्यामुळे येथील व्यवसायावर आलेले निर्बंध हे सोन्याच्या संपूर्ण भारतातील व्यवसायाला बाधित करणारे ठरतात, असे पेठे यांनी या पत्राद्वारे सूचित केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments