Monday, May 11, 2026
Homeअर्थविश्वGold Price Today: अखेर आज सोन्याचांदीला झळाळी, पाहा काय झाला भाव

Gold Price Today: अखेर आज सोन्याचांदीला झळाळी, पाहा काय झाला भाव

आज मल्टि कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. आज सकाळी 11 वाजता 5 एप्रिलच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.44 टक्के अर्थात 205 रुपयांनी वाढले आहेत, परिणामी या तेजीमुळे सोन्याचे दर 46,920 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. दुपारी 12 वाजता दरात 184 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या तेजीनंतर भाव 46899 रुपये प्रति तोळा झाले आहेत. मार्चच्या चांदीची वायदे किंमत 1.12% ने अर्थात 746 रुपयांनी वाढून  67,564 रुपये प्रति किलोग्रॅमवर दर ट्रेडिंग सुरू होतं.

अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्यूटी 7.5 टक्के करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळते आहे. अमेरिकेमध्ये सोन्याचे दर 0.58 डॉलरच्या तेजीमुळे 1,795.63 डॉलर प्रति औंस झाले आहेत, तर चांदी  0.03 डॉलरच्या घसरणीमुळे 26.30 डॉलर या स्तरावर आहे.

काय आहेत आजचे भाव?

-22 कॅरेट सोन्याचे दर: 46,600 रुपये प्रति तोळा

-24 कॅरेट सोन्याचे दर: 47,600 रुपये प्रति तोळा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments