२१ डिसेंबर,
अण्णासाहेब मगर स्टेडियमची जागा कामगार कल्याण मंडळाच्या मालकी हक्काची आहे. ही जागा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला मिळावी, यासाठी गेल्या 27 वर्षापासून कामगार कल्याण मंडळ प्रयत्न करीत आहे. याबाबत सोमवारी (दि. 16) मागील आठवड्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व केंद्रीय कामगार मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन व न्यायालयात दाद मागण्याचा इशारा महानगपालिकेला दिला होता. यानंतर शुक्रवारी (दि. 20) मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत भारती चव्हाण व इतर कामगार प्रतिनिधींची बैठक आयुक्तांच्या कक्षात झाली.
याबैठकीस महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, कामगार नेते व नगरसेवक माऊली थोरात, नामदेव ढाके, केशव घोळवे, सहायक आयुक्त मंगेश चितळे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहायक कल्याण आयुक्त समाधान भोसले, कामगार कल्याण निरीक्षक संजय सुर्वे, कामगार प्रतिनिधी तानाजी एकोंडे (थरम्ँक्स), राजेश हजारे (टाटा मोटर्स), गोरखनाथ वाघमारे (महेंद्र ही.आय.), स्वानंद पाठक( एस.के.एफ), श्रीकांत जोगदंड (डायनोमार्क), भरत शिंदे ( टाटा मोटर्स) आदी उपस्थित होते.
या बैठकीत आयुक्त हर्डीकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली. कामगार कल्याण मंडळाच्या नेहरूनगर येथील 27 एकर जागेत अण्णासाहेब मगर स्टेडियम व विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या 27 एकर जागेच्या बदल्यात महानगरपालिकेने कामगार कल्याण मंडळास रोख एक कोटी रुपये व शहरात पर्यायी सहा एकर जागा उपलब्ध करून द्यावी असा करार 27 वर्षापूर्वी करण्यात आला होता. कराराची अंमलबजावणी व पूर्तता न करता महानगरपालिकेने बेकायदेशीररीत्या कामगार कल्याण मंडळाला विश्वासात न घेता त्यांचा हक्क डावलून अण्णासाहेब मगर स्टेडियम पाडण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. मनपा प्रशासनाची ही भूमिका पूर्णत: बेकायदेशीर आहे. ही निविदा प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अन्यथा आगामी 15 दिवसात तीव्र आंदोलन करू व याबाबत न्यायालयात दावा दाखल करू असे, असा इशारा भारती चव्हाण यांनी दिला होता.
शुक्रवारी (दि. 20) झालेल्या बैठकीत मनपा प्रशासनाने कामगार कल्याण मंडळाला पुढे नमूद केल्याप्रमाणे जागा देण्याचे प्राथमिक स्तरावर मनपाने मान्य केले आहे. त्या जागा पुढीलप्रमाणे : आकुर्डी येथील ऐश्वर्यम सोसायटीशेजारी एक एकर, मोरवाडी लालटोपीनगर येथे 24 गुंठे, संभाजीनगर बर्ड व्हॅली शेजारी 26 गुंठे, मोशी बो-हाडेवस्ती येथे 53 गुंठे, वाकड येथे 7 गुंठे, चिखली जाधववाडी येथे गायरानमधील 2 एकर जागा देण्याचे प्रस्तावित आहे. तर दळवीनगर चिंचवड येथील 20 गुंठे जागा व रोख एक कोटी रुपये यापूर्वी मिळाले आहेत. वरीलप्रमाणे 6 एकर जागा कामगार कल्याण मंडळास सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्वरीत हस्तांतरण झाल्यास कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणार्थ विविध सामाजिक विकास प्रकल्प उभारण्याचे कामगार कल्याण मंडळाचे नियोजन आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातून कामगाराच्या वर्गणीतून जमा झालेल्या निधीतून महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाने मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे भव्य कामगार प्रकल्प उभारले आहेत. या ठिकाणी कामगार आणि कामगार कुटुंबियांसाठी प्रशिक्षण केंद्र, सभागृह, वसतिगृह, अभ्यासिका, जलतरण तलाव, ग्रंथालय, मनोरंजन केंद्र, नाटयगृह अशा प्रकारच्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. पिंपरी चिंचवड मनपाच्या आडमुठया धोरणामुळे पिंपरी चिंचवड सारख्या कामगारनगरीतच कामगार आणि कामगार कुटुंबीय यांच्यावर अन्याय दूर झाल्यास अशा सुविधांसह कामगारांच्या मुला-मुलींच्या विवाहासाठी अल्पदरात रिक्रिएशन हॉल व बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे नियोजन आहे. त्याचा उपयोग पिंपरी चिंचवड कामगारनगरीतील कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना होईल.
कराराची अंमलबजावणी व्हावी यासाठी 2005 मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांनी याबाबत लक्ष घालावे. यासाठी भारती चव्हाण, अरुण बोऱ्हाडे, शंकरराव गावडे, पी.बी. प्रभु, के.एस. काळभोर, व्ही. बी. पावसकर, बी. बी. इंगवले, आर. के. सोंडकर, किशोर ढोकळे, शिवाजी शेडगे, यशवंत भोसले, शेखर सावंत, सुभाष सरिन, विनायक घोरपडे, अरुण गराडे, बाळासाहेब तेलंगी, नामदेवराव गोलांडे, अरविंद प्रभुणे, दिनेश परपुळकर, बहिरट, एन. एन. जगदाळे, पी. एन. बारहाते, ए. आर. पाटील, हरिभाऊ चिंचवडे, आनंद ठकार आदी प्रमुख कामगार नेत्यांनी पवार साहेबांना विनंती केली होती.
मनपा आणि कामगार कल्याण मंडळ यांच्यामधील करारातील अटींची पूर्तता न झाल्यामुळे कराराचा भंग झाला आहे. जो पर्यंत कराराची पूर्तता होत नाही, मंडळास जागांचे हस्तांतरण होत नाही तोपर्यंत मनपा स्टेडियमच्या जागेवर मालकी हक्क प्रस्थापित करु शकत नाही. म्हणजेच स्टेडियमबाबत कोणताही पुनर्विकासाचा निर्णय मनपा प्रशासन घेऊ शकत नाही किवा निविदादेखील मंजूर करु शकत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे स्टेडियमच्या जागेची मनपाची मालकी वादातीत आहे. जोपर्यंत पिंपरी चिंचवड मनपा जागांचे कायदेशीर हस्तांतरण करीत नाही तोपर्यंत याबाबतचा कामगार कल्याण मंडळाचा दावा कायम आहे.
मिळणा-या जागांवर मंडळाच्या वतीने उभारण्यात येणारे प्रकल्पामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी सेवा, सुविधा उपलब्ध करून देता येईल. त्याचा कोणताही आर्थिक भार मनपाच्या तिजोरीवर पडणार नाही. असे असतानाही मनपा प्रशासन आकसबुद्धीने जागा ताब्यात देण्याबाबत आडमुठे धोरण मनपाने प्रशासनाने राबवू नये, अशी मागणी भारत चव्हाण यांनी यावेळी केली