Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीस्त्री उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी घे भरारीचे भव्य प्रदर्शन आकुर्डी येथील सीझन्स बँक्वेट...

स्त्री उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी घे भरारीचे भव्य प्रदर्शन आकुर्डी येथील सीझन्स बँक्वेट येथे सुरु

घे भरारी या फेस बुक ग्रुप ने नवव्यावसायिकांना आणि स्त्री उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य प्रदर्शन आकुर्डी सीझन्स बँक्वेट येथे आयोजित केले असून दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी याचे उद्घाटन माननीय संगीता ताई तरडे आणि व्यावसायिक जयंत पानसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले ..

4,5 आणि 6 ऑक्टोबर 2024 रोजी आकुर्डी , सीझन्स बँक्वेट येथे हे प्रदर्शन असून, सकाळी 11 ते रात्री 9 या वेळात नागरिकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी असे आवाहन घे भरारी समूहाचे संस्थापक राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे. हे एक्झिबिशन 3 ऱ्या मजल्यावर असून येथे ठाणे ,मुंबई , पुणे , इंदूर व नागपूर वरून वेगवेगळे व्यावसायिक आले आहेत.

करोना च्या काळात अनेक छोट्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला होता . त्यातून वर येऊन छोट्या व्यवसायिकाना एक व्यासपीठ मिळावे यासाठी घे भरारी समूहाची स्थापना झाली. या मध्ये ऑन लाईन आणि ऑफ लाईन असे काम चालते. पुणे , मुंबई , नाशिक येथे घे भरारीची उत्कृष्ट प्रदर्शने होत असतात.

80 पेक्षा जास्त छोटे व्यावसायिक व महिलांनी यामध्ये भाग घेतला आहे.
या मध्ये नवरात्री आणि दिवाळी साठी सजावटीच्या वस्तू , अत्युत्तम दागिने , विविध प्रकारचे कपडे, उत्तम परफुम्स , हटके असणाऱ्या कुर्ती, पर्सेस , हातमागाच्या वस्तू, कालाकुसरीच्या असंख्य वस्तू,हॅन्डमेड सोप्स , हस्तकलेच्या अनेक वस्तू ,पिशव्या ,खाद्यपदार्थ , सणांसाठी फराळ असे अनेक स्टॉल येथे बघायला मिळतील.
येणाऱ्या अनेक सणांची तयारी आणि भेट वस्तू देण्यासाठी हे प्रदर्शन नक्की उत्साहवर्धक ठरेल यात शंकाच नाही.

शनिवार दिनांक 5 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आपल्या आगामी चित्रपट फुलवंती याच्या प्रमोशन निमित्ताने भेट दिली. तसेच व्यावसायिक आणि टिव्ही स्टार अभिनेत्री मनीषा शिंदे मॅडम यांनी सुद्धा भेट देऊन सर्व व्यावसायिकांचे कौतुक केले .

या सर्व छोट्या व्यावसायिकांना आणि अनेक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रदर्शनाला सर्वानी जरूर भेट द्यावी.
बाहेर मार्केट मध्ये बघायला न मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या एक्सकलुसिव्ह साड्या आणि कपडे येथे बघायला मिळतील.
गिफ्टिंग साठी अनेक पर्याय येथे पहावयास मिळतील.

उत्कृष्ट दर्जा , वाजवी किंमत आणि उत्तम व्यावसायिक हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे .तरी सर्व आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी आणि आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असे प्राजक्ता माळी म्हणाल्या. मराठी तरुणांमध्ये व्यवसायाची आवड निर्माण व्हावी म्हणून पिंपरी चिंचवडककरा नी अवश्य भेट द्यावी अशी इच्छा संगीता ताई तरडे यांनी व्यक्त केली . हे प्रदर्शन रविवार पर्यंत असून सर्वांनी अवश्य भेट द्यावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments