Wednesday, June 18, 2025
Homeक्रिडाविश्वव्यवसायिक कबड्डी संघ तयार करण्यास सर्वसाधारण सभेची मान्यता ; क्रिडा सभापती उत्तम...

व्यवसायिक कबड्डी संघ तयार करण्यास सर्वसाधारण सभेची मान्यता ; क्रिडा सभापती उत्तम केंदळे यांच्या प्रयत्नांना यश

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काल (दि.२४) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत व्यावसायिक कबड्डी संघ स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार असल्याचे मत क्रीडा समितीचे सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी क्रिडा सभापती प्रा केंदळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराला कबड्डी या खेळाची वैभवशाली परंपरा असून अद्याप पर्यंत महानगरपालिकेच्या वतीने व्यवसायिक कबड्डी संघ स्थापन झालेला नव्हता. नवी मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी शासन निर्णय २०१५ नुसार कबड्डी संघ दत्तक घेऊन व्यवसाय कबड्डी संघ तयार करण्यात आलेला आहे.नवी मुंबई, ठाणे, पुणे येथे शासनाच्या निर्णयानुसार व्यावसायिक कबड्डी संघ स्थापन केलेला आहे. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका कबड्डी खेळ खेळण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करत आहे. त्यासाठी आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी बैठकी झाल्या. आज व्यावसायीक कबड्डी संघ स्थापन करण्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली ही आनंदाची बाब आहे.

कबड्डी खेळाच्या विकासाला पूरक,पोषक वातावरण असतानाही आपल्या महापालिकेचे क्षेत्रात कबड्डी खेळाचा एकही व्यावसायिक संघ निर्माण झालेला नव्हता. कबड्डी संघ व शहरातील उत्कृष्ट खेळाडू निवडून तयार करणार आहे. संघामुळे खेळण्याची व्याप्ती वाढून कबड्डीचा स्तर उंचावणार आहे. कबड्डीत गरीब घरातील विद्यार्थी असतात या निर्णयामुळे त्यांचा आर्थिक स्तर सुधारेल व कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात मिळेल.सकस आहार आदी गोष्टीची खेळाडूला स्वतःसाठी उपलब्ध करता येतील. निवड चाचणीद्वारे खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूला चांगले मानधन देण्यात येणार आहे. वैद्यकीय सुविधा,प्रवास खर्च, क्रीडा साहित्य व गणवेश आदी बाबी खेळाडूंना पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना उच्च पातळीवर खेळण्याची संधी मिळणार असल्याची माहिती ही केंदळे यांनी दिली.

नगरसेवक कुंदन गायकवाड गेली अनेक दिवस झाले व्यवसायिक कबड्डी संघ तयार व्हावा यासाठी क्रीडा सभापती प्राध्यापक उत्तम केंदळे यांच्याकडे पाठपुरावा करत होते. अखेर प्रा केंदळे यांच्या प्रयत्नांना यश आले असून भविष्यकाळात अनेक अनेक उत्तम खेळाडू शहरात तयार होणार आहेत. केंदळे यांनीही या प्रस्तावाला सहमती दर्शवत मंजुरी दिली होती.शहरात कबड्डी प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. आतापर्यंत झालेल्या क्रीडा सभापती मध्ये प्राध्यापक उत्तम केंदळे यांची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे.

महासभेत व्यवसायिक कबड्डी संघा सोबत सर्वोत्कृष्ट क्रिडा पुरस्कार व व्यायाम शाळा या धोरणांना मंजुरी देण्यात आली.सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कारांमध्ये शहरातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. देशाच्या मेजर ध्यानचंद पुरस्कारा प्रमाणे क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहे.मार्गदर्शक, प्रशिक्षक, खेळाडू यांचा यामध्ये समावेश असणार आहे.व्यायाम शाळेमध्ये अ,ब,क असे प्रकार करण्यात आले आहेत.”अ” मध्ये व्यायाम शाळा खाजगी तत्वावर देऊन भाडे आकारण्यात येणार आहे. यामध्ये महानगरपालिके ला उत्पन्न मिळणार असून यामध्ये जवळपास २५ शाळा चा समावेश आहे. “ब” मध्ये सामाजिक संस्था किंवा मंडळांना दोन हजार रुपये देऊन चालवायला देणार आहे. “क” मध्ये ज्या चालत नाही त्या महापालिका चालवणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments