Thursday, May 23, 2024
Homeगुन्हेगारीगौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक…

गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक…

मागील काही महिन्यात गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.सुरुवातीला गौतमीच्या अश्लील नृत्यावरून तर नंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन- ऑफलाईन स्तरावर होणाऱ्या टीकांमुळे गौतमी सदैव चर्चेत राहिली. या चर्चांमध्ये अनेकांनी गौतमीचीच चूक दाखवली होती पण त्यांनतर २४ फेब्रुवारीला असा काही प्रकार घडला की टीकाकारही गौतमीच्या बाजूने उभे राहू लागले. गौतमीचा कपडे बदलतानाच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आता पुणे पोलिसांना मोठे यश हाती आले आहे. प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ काढणाऱ्या एकाला पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.

गौतमीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या मुलाला ताब्यात घेण्यात आले. गौतमीने केलेल्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगानेदेखील यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

२४ फेब्रुवारीला पुण्यात एका कार्यक्रमाच्या वेळी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ कोणीतरी शूट करून व्हायरल केला. हा व्हिडीओ गौतमी पर्यंत पोहोचताच मग तिच्याच ग्रुपमधील एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती

गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता तिला बदनाम करण्यासाठी तिचा व्हिडीओ शूट करण्यात आला असल्याची चर्चा होती. याप्रकरणी गौतमीने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची कानउघडणी केली होती. “तुमचं काही जात नाही पण मला लोकं बोलतात, तुमच्याही घरी, आई- बहिणी असतील ना, मग हे असं काम करताना त्यांचा विचार मनात आला नाही का?” असा प्रश्न गौतमीने केला होता. शिवाय हा व्हिडीओ आपण सर्वात आधी आपल्या आईला पाठवून तिला कल्पना दिली होती हे म्हणताना गौतमीचे डोळे पाणावले होते.

गौतमी पाटील आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप वारंवार होत असतानाही त्याचा तिच्या लोकप्रियतेवर परिणाम झालेला नाही. गौतमीचा ‘घुंगरू’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments