Wednesday, February 11, 2026
Homeअर्थविश्वजगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानींनी मस्क आणि बेझोस यांनाही मागे...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानींनी मस्क आणि बेझोस यांनाही मागे टाकले

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतातील उद्योगपती गौतम अदानी यांनी एॅलोन मस्क आणि जेफ बेझोस यांना मागे टाकले आहे. २०२१ मध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या मते अदानी यंदाच्या वर्षी जगात सर्वात जास्त संपत्ती अर्जित करणारे उद्योगपती झाले आहेत. 

माध्यमांमध्ये फारसे न दिसणारे गौतम अदानी यांनी यंदाच्या वर्षी आपल्या संपत्तीत १६.२ बिलियन्स अमेरिकी डॉलर्सची वाढ केली आहे. त्यांची संपत्ती आता ५० बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे.

यंदाच्या वर्षी अपवाद वगळता सर्वच अदानी ग्रुपचे शेअर आणि स्टॉक्स ५० टक्क्यांच्या वर वाढ दाखवत आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी गौतम अदानी यांच्यातील वार्षिक संपत्ती वाढीतील फरक हा ८.१ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतका आहे. अदानी उद्योगातील विविध क्षेत्रात आपले पाय वेगाने पसरवत आहेत. त्यांनी भारतातील पोर्ट, विमानतळं, डाटा सेंटर्स आणि कोळसा खाणी क्षेत्रात आपला विस्तार मोठ्याप्रमाणावर वाढवला आहे. 

अदानी गॅस लिमिटेड यंदाच्या वर्षी ९६ टक्क्यांनी, अदानी एन्टरप्राईजेस ९० टक्के, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ७९ टक्के आणि अदानी पोर्ट, स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड जवळपास ५२ टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढ दाखवत आहेत. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments