Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीगौरी लंकेश हत्याप्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक

गौरी लंकेश हत्याप्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक

१० जानेवारी २०२०,
पत्रकार, लेखिका गौरी लंकेश हत्याप्रकरणी मुख्य आरोप ऋषिकेश देवडीकरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मूळचा औरंगाबादचा असलेल्या ऋषिकेश देवडीकरला विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील कतरास येथून बेड्या ठोकल्या आहेत. ऋषिकेश गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. ऋषिकेश देवडीकरला आज, शुक्रवारी धनबादमधील कोर्टात हजर करण्यात येणार असून येणार असून कोठडी घेतल्यानंतर बेंगळुरूत आणून त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी ऋषिकेश गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील धनबादमध्ये ओळख बदलून राहत होता, याची माहिती एसआयटीला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून त्याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, गौरी लंकेश हत्ये प्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, दि. ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. तीन हल्लेखोरांनी गौरी लंकेश यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गौरी लंकेश एक पत्रकार होत्या, कन्नडमधील ‘लंकेश पत्रिके’च्या त्या संपादक. या वेगळ्या वृत्तपत्राची सुरुवात त्यांचे वडील पी. लंकेश यांनी १९८० मध्ये केली होती. ‘लंकेश पत्रिके’ हे व्यावसायिक वृत्तपत्र नव्हते. आंदोलनकारी विवेकवादी विचारसरणीच्याच बाण्याने त्यांची पत्रकारिता प्रेरित होती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments