Friday, September 20, 2024
Homeताजी बातमी' गदर २ ' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , आठ दिवसांतच कमावले...

‘ गदर २ ‘ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , आठ दिवसांतच कमावले ३०० कोटी…!

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट ‘गदर २’ रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्टला सर्वत्र सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. तीन दिवसांत १०० कोटी आणि पाच दिवसांत २०० कोटी कमावल्यानंतर आता ‘गदर २’ने आणखी एक पराक्रम केला आहे. शुक्रवारी आठव्या दिवशी हा चित्रपट ३०० कोटी क्लबमध्ये सहभागी झाला आहे. मात्र, या प्रकरणात ७ दिवसांत हा पराक्रम करणाऱ्या शाहरुखच्या ‘पठाण’चा रेकॉर्ड तो मोडू शकला नाही. मात्र, आता शनिवार आणि रविवारी दुसऱ्या वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत पुन्हा एकदा बंपर जंप होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता हे वादळ अजून थांबणार नसल्याचे दिसते.

गदर २ च्या बंपर कमाईने पुन्हा एकदा सिंगल स्क्रीन थिएटर्सचे साम्राज्य प्रस्थापित केले आहे. शहरातील मल्टिप्लेक्स प्रेक्षकांपेक्षा सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये चित्रपटांची जास्त क्रेझ आहे. शुक्रवारी देखील चित्रपटाची सरासरी प्रेक्षक संख्या ३२.०६% होती. थिएटरमधील ५५% पेक्षा जास्त जागा रात्रीच्या कार्यक्रमांनी व्यापलेल्या होत्या. दिल्ली-एनसीआर, मुंबई सर्किट, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र/निजाम, पंजाब यांसारख्या प्रत्येक राज्यात चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहण्यासारखी आहे.

‘गदर २’ चे बजेट ८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर sacnilk नुसार, चित्रपटाने ८ दिवसात देशात ३०५.१३ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. शुक्रवारी, चित्रपटाने ८ व्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर २०.५० कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. गुरुवारच्या तुलनेत ही घट -११.९४% आहे. मात्र, आनंदाची गोष्ट म्हणजे शनिवारी सकाळीच प्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली. पुढे रविवारी अधिक कमाई अपेक्षित आहे.

‘गदर २’ ने ८ दिवसात देशात ३०५.१३ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे, तर भारतात त्याचे एकूण कलेक्शन ३६०.१० कोटी रुपये आहे. या चित्रपटाने परदेशात ३५ कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे ‘गदर २’ ने आठ दिवसांत जगभरात ३९५.१० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. शनिवारी हा चित्रपट आता जगभरात ४०० कोटी क्लबमध्ये सहभागी होणार आहे.

हिंदीत ३०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा सर्वात पहिला चित्रपट ‘पठाण’ आहे. शाहरुखचा हा चित्रपट ७ दिवसात ३०० कोटी क्लबमध्ये पोहचला होतो. तर ‘बाहुबली’ला हा पराक्रम करण्यासाठी १० दिवस लागले. यशच्या KGF २ ने १० दिवसांत हिंदीत ३०० कोटींची कमाई केली होती. या यादीत पुढे ‘दंगल’ आहे ज्याने १३ दिवसांत हा आकडा गाठला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments