Tuesday, February 27, 2024
Homeअर्थविश्वसीएसआर फंडातून पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून आपले सामाजिक दायित्व पार पाडावे - महापौर...

सीएसआर फंडातून पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून आपले सामाजिक दायित्व पार पाडावे – महापौर उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने सँडविक कंपनीने सीएसआर फंडातून सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रकल्प शहरात उभारुन पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला आहे. ही बाब कौतुकास्पद असून इतर कंपन्यांनी देखील आपल्या सीएसआर फंडातून पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून आपले सामाजिक दायित्व पार पाडावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.

सँडविक कंपनीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे सीएसआर फंडातून महापालिकेच्या सहकार्याने सांडपाणी प्रक्रीया संयंत्र प्रकल्प उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्या करुणा चिंचवडे, माधुरी उर्फ मोनाताई कुलकर्णी, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उप आयुकत सुभाष इंगळे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, सँडविक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किरण आचार्या, अध्यक्ष सुनिल जोशी, सोनाली मुळे, युनिकेअर टेक्नॉलॉजिज प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आनंद रावल, प्रकल्प व्यवस्थापक तुषार मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील नाल्यांमधून वाहत जाणारे सांडपाणी तसेच कंपन्यांचे रसायनयुक्त सांडपाणी नद्यांमध्ये मिसळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदुषण होऊन पर्यायाने पर्यावरणाची हानी देखील होते. या कारणामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे व जलप्रदुषण कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची उभारणी करण्यात येत आहे. शहरातील वाढते औद्योगिकीकरण, उद्योग व व्यवसायाच्या उपलब्धतेमुळे शहराची वाढती लोकसंख्या व नागरीकरणामुळे जलप्रदुषणामध्ये देखील वाढ होत आहे. जलप्रदुषण कमी करण्यासाठी सँडविक कंपनी यांनी युनिकेअर टेक्नॉलॉजिज् प्रा.लि. च्या सहकार्याने प्रेमलोक पार्क आणि भागुजी गोलांडे उद्यान, चिंचवड येथे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रकल्प उभारलेले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे दहा हजार लिटर प्रदुषित सांडपाण्यावर प्रक्रीया केली जाणार आहे. हे पाणी उद्यानांकरिता वापरण्यात येणार आहे. त्यामुळे दहा हजार लिटर शुद्ध पाण्याची बचत देखील होणार आहे. इतर कंपन्यांनी देखील अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेऊन नदी प्रदुषण मुक्ततेसाठी हातभार लावावा. त्यासाठी महापालिकेच्या सीएसआर कक्षाकडे संपर्क साधावा असे आवाहनही महापौर माई ढोरे यांनी यावेळी केले.

आयुक्त राजेश पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह उपक्रमातंर्गत शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा उपक्रम सुरु केलेला आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. युनिकेअर टेक्नॉलॉजिज प्रा.लि. आणि सी.एच.एफ. इंडिया फांऊडेशन यांनी देखील महत्वपूर्ण सहभाग घेऊन सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारण्याचे काम केले आहे. प्रकल्पामुळे सांडपाण्याचा पुनर्वापर उद्यानासाठी करण्यात येणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी सँडविक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किरण आचार्या, तसेच युनिकेअर टेक्नॉलॉजिज् प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक आनंद रावल यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंजन रावल व सुत्रसंचालन रिया खंडुरी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments