३० जून २०२१,
लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज स्थानकांवर गेल्यावर्षी मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये केली होती.
रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात ५० रुपयांवर गेलेल्या प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा १० रुपयांपर्यंत खाली येतील. १ जुलैपासून या नियमाची अंमलबजावणी होईल.
लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज स्थानकांवर गेल्यावर्षी मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये केली होती. तसेच हे तिकिट सरसकट न देता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना सोडण्यास नागरिकांनाच दिले जात होते.
मात्र, आता रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ लागली आहे, त्यामुळे चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 10 रुपये करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मनोझ झंवर यांनी दिली.


