Saturday, March 22, 2025
Homeआंतरराष्ट्रीय१ डिसेंबरपासून लोहगाव विमानतळावरून २४ तास विमानवाहतूक सुरु राहणार

१ डिसेंबरपासून लोहगाव विमानतळावरून २४ तास विमानवाहतूक सुरु राहणार

जगभर थैमान घातलत कोरोना महामारीने संपूर्ण जगच ठप्प केले होते. त्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर करत विमान प्रवासावर बंदी घातली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर व लसीकरण सुरु झाल्यापासून विमान प्रवासाच्या निर्णयामध्येही थोडी शिथिलता देण्यात आली आहे. अशातच शहरातील लोहगाव विमानतळ दुरुस्तीच्या काम सुरु असल्याने विमानतळावरील रात्रीची वाहतूक बंद होती. नुकतीच लोहगाव विमानतळावर सुरु असलेले रन वे लायटिंगचे काम संपले आहे.

त्यामुळे येत्या 1 डिसेंबरपासून लोहगाव विमानतळावरून 24 तास विमानवाहतूक सुरु राहणार आहे. विमानतळ २४ तास खुले झाल्यानं विमानाच्या फेऱ्या वाढण्याबरोबरच प्रवासी संख्याही वाढणार आहे. विमानतळाची सेवा पूर्णवेळासाठी खुली झाल्याने प्रवाश्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

असे असेल हिवाळी वेळापत्रक

1 डिसेंबरपासूनच लोहगाव विमानतळाचे ‘हिवाळी वेळापत्रक’ सुरू होत आहे. दररोज जवळपास 63 विमानांची उड्डाणे होणार आहेत. विंटर शेड्यूल सुरू झाल्यानंतर विमानांची संख्या दुप्पट होईल. 1डिसेंबरपासून कोइंबतूर, अमृतसर, व त्रिवेंद्रम शहरांसाठी नव्याने विमानसेवा सुरू होत आहे.

‘रन वे लाइट मध्ये वैविध्यता

पुणे विमानतळाच्या रन वे वर विविध प्रकारचे लाईट बसविले आहेत. हे लाईट विविध भागात बसवण्यात आले आहेत.

१) टॅक्सी वे लाईट,
२) पापी लाईट्स,
३) रन वे एंड आयडेंटिफिकेशन लाइट,
४) रनवे एज लाईट, थ्रेशोल्ड लाईट्स,
अप्रोच लाईट
धावपट्टीवरील रन वे लायटिंगचे काम पूर्ण झाले असून येत्या 1 डिसेंबरपासून पुणे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी 24 तास खुले होत आहे. याच वेळी पुणे विमानतळाचा विंटर शेड्यूलदेखील लागू करीत आहोत. त्यामुळे विमानांच्या संख्येत वाढ होईल. – संतोष डोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments