‘संगी’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित..!!!
अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित, सुप्रीम मोशन पिक्चर्स आणिसत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ या बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताचप्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टिझरने आधीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतानिर्माण केली होती आणि आता ट्रेलरमधून चित्रपटाचा मनोरंजक प्रवासअधिकच समोर आला आहे. हलकीफुलकी कथा, मैत्रीतील गोडवा, आणिहास्याचा अफाट डोस यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडेल, हे नक्की..!
‘संगी’ची कथा तीन मित्रांभोवती फिरताना दिसत असून या तिघांच्याआयुष्यातील बालपणापासूनचे गंमतीशीर, आनंददायी क्षण ह्यातहलक्याफुलक्या शैलीत मांडण्यात आले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मैत्री, पैसे आणि त्यातून येणारे रंजक वळण दिसत आहे. आता ही मैत्री आणि पैसे हेनेमके काय प्रकरण आहे, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. ‘संगी’ हा चित्रपट १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित कुलकर्णी म्हणतात,”‘संगी’ हा चित्रपट मित्रांच्याफक्त गंमतीजमतींचीच गोष्ट नाही तर मैत्रीची खरी व्याख्या उलगडणारी कथाआहे. हलक्याफुलक्या विनोदांमधूनच आम्ही प्रेक्षकांना विचार करण्यास भागपाडणारी कथा सादर केली आहे. तीन मित्रांची ही कथा प्रेक्षकांच्या हृदयालास्पर्श करेल, याची आम्हाला खात्री असून प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनीचित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा.”
सत्यम ज्वेलर्स हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत. सत्यम ज्वेलर्सने याचित्रपटाच्या कथेचे समर्थन करत, ‘मैत्री’वर आधारित संदेश देणाऱ्या याचित्रपटाचा भाग होण्याचा आनंद व्यक्त केला आहे. चित्रपटाचा उद्देश लोकांनाहसवण्याबरोबरच मैत्री आणि पैसे यातील समन्वयाचा संदेश देण्याचा आहे.
चित्रपटाच्या लोकप्रिय स्टार कास्टने सत्यम ज्वेलर्सच्या निगडी शोरूमला भेटदिली आणि शोरूमचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वातावरण, ज्वेलरी कलेक्शन आणिएकूणच संपूर्ण अनुभवाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी सत्यम ज्वेलर्सचेअभिनंदन करत, इथे मिळणाऱ्या अद्वितीय सेवा आणि खास कलेक्शनबद्दलश्री. किरणराज चोप्रा, महावीर चोप्रा, दिपक चोप्रा व राहुल चोप्रायांच्याबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.