Sunday, August 16, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या...

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात मोफत बसपास योजना…

पिंपरी, दि. १५ जुलै

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना, तसेच महानगरपालिका हद्दीतील शासनमान्य खासगी शाळा व महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना घर ते शाळा व शाळा ते घर अशा स्वरूपाचा बसचा मोफत पास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच शासनमान्य खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी बसपासच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम चलनाद्वारे महानगरपालिका कोषागारात भरून ते चलन अर्जासोबत पीएमपीएमएलकडे सादर केल्यानंतर बसपास देण्यात येणार आहे,यास महापालिका सभेने मान्यता दिली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान ७५ टक्के उपस्थिती पूर्ण केलेली असावी. विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेचे अंतर किमान २ कि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. ही योजना महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिका व शासनमान्य खासगी शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहणार आहे.

विद्यार्थ्यांनी निर्धारित नमुन्यातील अर्ज भरून रहिवासी पुरावा, आधार कार्ड अथवा इतर पत्ता असलेले ओळखपत्र, शाळेचे प्रमाणपत्र तसेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडून संबंधित शाळेत जमा करावेत. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी निर्धारित रक्कम पीएमपीएमएलच्या अधिकृत डेपोमध्ये भरून अर्ज सादर करावेत, तर महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बसपास पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत अर्ज वाटप व स्वीकार प्रक्रिया १५ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत होणार असून, बसपास तयार करणे व वितरण १५ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान करण्यात येईल. या बसपासचा लाभ ३० जून २०२७ पर्यंत उपलब्ध राहणार आहे.

महानगरपालिकेने सर्व मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांची यादी वेळेत सादर करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा,  पालकांनीही निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून आपल्या पाल्यांसाठी मोफत बसपास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments