Wednesday, July 15, 2026
Homeआरोग्यविषयकसप्तर्षी समग्र दिव्यांग अभियाना अंतर्गत चौथे दिव्यांग कागदपत्रे सहयोग शिबिर रहाटणी येथे...

सप्तर्षी समग्र दिव्यांग अभियाना अंतर्गत चौथे दिव्यांग कागदपत्रे सहयोग शिबिर रहाटणी येथे संपन्न

मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी रखुमाई महिला संस्था कार्यालय, रिचमंड पार्क, रहाटणी येथे आयोजित केला होता . येथे दिव्यांग बांधवांची विविध कागदपत्रे काढण्यासाठी होणारी गैरसोय कमी व्हावी व त्यांना आवश्यक दाखले व कागदपत्रे तसेच दिव्यांगांसंबधीत असणाऱ्या शासकीय व इतर योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली मिळावा याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये त्यांना दिव्यांग दाखले (युडीआयडी) मिळण्यासाठी नोंदणी, निरामय आरोग्य योजना अंतर्गत क्लेम /वैद्यकीय खर्चाचे कागदपत्राची स्वीकृती ,रेल्वे सवलत नोंदणी, शासकीय शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य, दिव्यांग मुलांचे व कुटुंबाचे टॅक्स सवलत व भविष्य आर्थिक नियोजन मार्गदर्शन इ. सुविधा देण्यात आल्या.या शिबिरास पिंपरी चिंचवड विभागातील जवळपास 75 दिव्यांग बांधवानी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच सप्तर्षी फाउंडेशन सोबत दिव्यांग व्यक्तींच्या पालकांनी सुद्धा स्वयंसेवक म्हणून या कार्यासाठी आपली सेवा दिली.

सदर शिबिराचे आयोजन स्वीकृत नगरसेवक श्री संदीप नखाते यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी सदर शिबिराचे उदघाटन श्री.संदीप नखाते (स्वीकृत नगरसेवक) , यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी रोहन भालेराव, सप्तर्षी फाउंडेशन चे संस्थापक सचिव श्री.मनोजकुमार बोरसे , सौ.रूशाली बोरसे, समीना काझी, शितल जाधव, श्रध्दा नगरे, जयश्री डांगे, उमेश देसाई, किरण जाधव, सचिन, प्रतीक्षा तांबे, साहील ठोंबरे तसेच पालक प्रतिनिधी व स्वयंसेवक म्हणून हर्षल सुरूशे इत्यादी उपस्थित होते. सदर शिबिराच्या समारोपात उपस्थित लाभार्थी दिव्यांग बांधव तसेच त्यांचे पालक व स्थानिक रहिवाशांनी सप्तर्षी फाउंडेशन यांचे आभार व्यक्त केले.

UDID कार्ड खालीलप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना अनेक फायदे मिळवून देईल:
1)अपंग व्यक्तींना कागदपत्रांच्या एकापेक्षा जास्त प्रती बनवण्याची, देखरेख करण्याची आणि अनेक कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही कारण कार्ड सर्व आवश्यक तपशील कॅप्चर करेल जे वाचकांच्या मदतीने डीकोड केले जाऊ शकतात.
2) UDID कार्ड हे भविष्यात विविध फायद्यांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींची ओळख, पडताळणीचे एकमेव दस्तऐवज असेल.
3)UDID कार्ड अंमलबजावणीच्या पदानुक्रमाच्या सर्व स्तरांवर लाभार्थींच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा मागोवा घेण्यास देखील मदत करेल – गाव स्तर, ब्लॉक स्तर, जिल्हा स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तर.

संपूर्ण देशात आजवर 1,16,91,884 अर्ज वैश्विक दिव्यांग ओळखपत्र व प्रमाणपत्र ( युडीआयडी ) मिळण्यासाठी प्राप्त झाले आहेत. देशात वैश्‍विक दिव्यांग ओळखपत्र व प्रमाणपत्र (युडीआयडी ) 60,31,419 दिव्यांग बांधवांना देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात 6,35,441 दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. सदर ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या प्रक्रियेद्वारे ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. सदर अर्ज भरल्यानंतर दिव्यांग बांधवांनी जवळील उपलब्ध नोंदणीकृत शासकीय रुग्णालयात जावयाचे असते त्यानंतर सदर रुग्णालय दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणीकरण करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान करते व वैश्विक ओळखपत्र दिव्यांग बांधवाला कुरियर सेवेद्वारे घरपोच प्राप्त होते.
सदर शिबिरात सप्तर्षी फाउंडेशन द्वारे दिव्यांग बांधवांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र व माहिती दिव्यांग बांधवांकडून घेण्यात आली. यानंतर सप्तर्षी फाउंडेशनच्या टीम कडून सदर अर्ज ऑनलाइन भरण्यात येणार आहे ,तदनंतर सदर अर्ज प्रिंट करून दिव्यांग बांधवांनी संबंधित रुग्णालयात शासकीय रुग्णालयात जावयाचे आहे.

सप्तर्षी फाउंडेशनच्या वतीने जिल्हा रुग्णालय सांगवी /औंध येथे दिव्यांग बांधवांना यूडीआयडी मदत केंद्र 2 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यात आले आहे. सदर सेवेचा आज पर्यंत 400 पेक्षा अधिक दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला आहे.
मनोजकुमार बोरसे यांचे आवाहन :-

संस्था चालवत असलेले सदर उपक्रम हे माझ्या व्यक्तिगत उत्पन्नातील मोठा हिस्सा (५०% हून अधिक) तसेच संस्थेचे सभासद व हितचिंतकांकडून आलेली सहयोग राशी यावर चालत असून ,अनेक वर्षे काम केल्यानंतर जनसामान्य तसेच दिव्यांगांच्या आशा ,अपेक्षा व संख्या दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असून वृद्धिंगत आशा ,अपेक्षा व संख्या सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून अंमलात आणण्यासाठी व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक मदत ,साधने व मनुष्यबळाची आवश्यकता असून समाजातील दानशूर व्यक्तींना ,उद्योजकांना व कंपन्यांना संस्थेला सहयोग करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक सचिव श्री. मनोजकुमार बोरसे यांनी केले आहे. उत्पन्न कर कायद्यातील 80 ग तरतुदी अंतर्गत संस्थेला दान देणाऱ्या व्यक्तीस किंवा कंपनी कंपनीला उत्पन्न कर सवलत अनुज्ञेय आहे श्री.बोरसे म्हणाले संस्थेचे विविध संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.वैशालीताई मुळे,सचिव श्री. श्रीकांत चव्हाण व सदस्य श्री. वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments