१६ डिसेंबर
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची झारखंडमधील पाकुड येथे निवडणूक प्रचारसभा होती. या सभेतही त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा कालावधीही जाहीर केला. ‘पुढील चार महिन्यांच्या आत आभाळाची उंची गाठणारं एक भव्य मंदिर अयोध्येत तयार होत आहे,’ असं ते म्हणाले. अमित शहा म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच अयोध्येबाबतचा निर्णय दिला. गेली १०० वर्षे भारतीयांची मागणी होती की अयोध्येत भव्य राम मंदिर बनवलं गेलं पाहिजे. आता राम मंदिर होऊ घातलं आहे. काँग्रेस पक्ष विकासही करू शकत नाही, देशाला सुरक्षितही ठेवू शकत नाही आणि देशातल्या जनतेच्या भावनांचा आदरही करू शकत नाही.’
चार महिन्यांत भव्य राम मंदिर: अमित शहा
RELATED ARTICLES