Saturday, September 30, 2023
Homeगुन्हेगारीपुणे-मुंबई हायवेवर कारची ट्रकला धडक, चार जणांचा जागीच मृत्यू

पुणे-मुंबई हायवेवर कारची ट्रकला धडक, चार जणांचा जागीच मृत्यू

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. भरधाव कारने उभ्या ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या कडेला उभा केलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी म्हणजेच आज दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्कोडा कार भरधाव वेगाने जात होती आणि कारने ट्रकला धडक दिल्यानं अपघात झाल्याचं कळतंय. दरम्यान, या अपघातात कार चक्काचूर झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार MCA क्रिकेट स्टेडियमच्या समोरच हा अपघात झाला असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. अपघाताची भीषणता एवढी होती की यात कार मधील चारही जणांचा मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले असून मृतदेह कारमधून काढण्याचे काम सुरू आहे.

भरधाव स्कोडा कार चालकाने शंभर मीटरवर ब्रेक मारले असून त्याचे व्रण रस्त्यावर उमटले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments