Friday, June 21, 2024
Homeउद्योगजगतफोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे भयमुक्त एमआयडीसी अभियान

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे भयमुक्त एमआयडीसी अभियान

१७ डिसेंबर
भयमुक्त एमआयडीसी अभियान हा कार्यक्रम आज भोसरी एमआयडीसी येथे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन मार्फत घेण्यात आला यावेळी फोरमच्या अध्यक्ष अभय भोर आणि अनेक उद्योजक कामगार उपस्थित होते यावेळी उद्योजक कामगार उपस्थित होते एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी महिलांची छेडछाड कामगारांना लुटालूट तिचे प्रकार कंपन्यांमध्ये चोऱ्या अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे कामगार वर्ग व उद्योजक त्रस्त झाले आहेत या चोऱ्यांना व महिलांच्या सुरक्षितेसाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी विशेषता एक तारीख ते 15 तारीख या तारखे दरम्यान पगाराचे दिवस असतात यावेळी काही परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन नाईट च्या कामगारांना मोबाईल लोटालोटी चे प्रकार घडत आहेत तसेच पहाटेच्या वेळी अनेक कंपन्यांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे याला आत्ताच आळा न घातल्यास संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात पसरेल अनेक कंपन्यांमध्ये नाईट शिफ्ट करण्यासाठी कामगारवर्ग येण्यास टाळाटाळ करतो तसेच परिसरात काही ठिकाणी महानगरपालिकेच्या लाईट या बंद अवस्थेमध्ये असतात अनेकदा लाईटचे काम सुद्धा चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत.

टि ब्लॉक परिसरामध्ये विशेषता काही भागांमध्ये दिवसा हे प्रकार घडत असतात या परिसरात शेकडो महिला कामासाठी येतात परंतु जाताना अंधार असल्यामुळे ह्या महिलांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन जावे लागते नुकतंच देशांमध्ये महिलांच्या ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळे आधीच महिलावर्ग भयभीत अवस्थेमध्ये असतो रात्रीच्यावेळी पोलिसांकडे वाहन व्यवस्था मोठ्या प्रमाणात परिसरात गस्त घालण्यासाठी दिरंगाई होतेरात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त योजना राबविल्यास गुन्हेगारांवर त्याचा वचक राहील रात्रीच्या वेळी रस्त्यावर वर्दळ सुद्धा नसते परिसरामध्ये तीन ते चार मोठ्या झोपडपट्ट्या आहेत परिसरामध्ये मोटरसायकलीवर ट्रिपल सीट घेऊन कामगारांना लुटण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे उद्योजकांचे कंपाऊंड पत्रे कापून नेले जातात व वेळप्रसंगी वाॅचमन ला सुद्धा मारहाण केली जाते तसेच परिसरामध्ये रोज अनधिकृत टपऱ्या येत आहेत व या टपरयांचा यांचा वापर गुन्हेगारी आसरा कामासाठी केला जातो पोलीस यंत्रणेने आणि शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन मार्फत अनेक ठिकाणी उग्र आंदोलने केली जातील असे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले यावेळी फोरमचे अध्यक्ष अभय भोर संतोष गायकवाड. संतोष पाटील, राजेश बोरकर, सुभाष गायकवाड शुभम कौशिक रोहिदास वायाळ राहुल केशरवानी हीराराम सोनकुसरे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments