Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीपुण्यात माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

२९ ऑक्टोबर २०२०,
माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांचे पती जयंत रजपूत (रा. खजिनाविहार) यांनी लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसमध्ये मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत यांच्या पत्नी नीता परदेशी या काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्या आणि माजी नगरसेविका आहेत. जयंत यांचे लॉ कॉलेज रस्त्यावरील कांचन गल्लीत ऑफिस आहे. त्यांची बारामतीत औषध कंपनी आहे. ते व्यवसायिक आहेत. बुधवारी मध्यरात्री त्यांनी ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना वडील जयंत यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बुधवारी रात्री जयंत राजपूत हे काही कामानिमित्ताने ऑफिसमध्ये थांबले होते. रात्री उशिरापर्यंत ते कार्यालयातच होते. वडील घरी न आल्यामुळे त्यांच्या मुलाने कार्यालयात जाऊन पाहणी केली असता जयंत राजपूत यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तातडीने डेक्कन पोलिसांना देण्यात आली. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. जयंत राजपूत हे मनमिळावू स्वभावाचे होते, ते इतरांना समुपदेशन करत होते. जयंत राजपूत यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments