Wednesday, December 6, 2023
Homeगुन्हेगारीलाचखोरीत पुणे विभाग सलग दुसऱ्या वर्षी प्रथम, नाशिक दुसऱ्या तर उपराजधानी पाचव्या...

लाचखोरीत पुणे विभाग सलग दुसऱ्या वर्षी प्रथम, नाशिक दुसऱ्या तर उपराजधानी पाचव्या क्रमांकावर

राज्यात सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हे पुणे विभागात दाखल असून दुसऱ्या स्थानावर नाशिक तर उपराजधानी पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, सुसंस्कृतांचे शहर अशी ओळख असलेले पुणे शहर लाचखोरीच्या प्रकरणात सलग दुसऱ्या वर्षीही प्रथम क्रमांकावर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच लाचखोरीच्या गुन्ह्यांची आणि आरोपींची आकडेवारी जारी केली आहे.

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांची कामे लाच दिल्याशिवाय होत नसल्याचे प्रकार नेहमीच उघडकीस येतात. आता तर रोख रकमेऐवजी थेट सोन्याचे दागिने किंवा मोठमोठय़ा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लाचेच्या स्वरूपात मागितले जात असल्याचेही समोर आले आहे. विशेश म्हणजे, महिला कर्मचारीसुद्धा लाच मागण्यात आघाडीवर आहेत. पोलीस आणि महसूल विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक लाच मागितल्याचेही समोर आले आहे.

गेल्या वर्षभरात पुणे विभागात लाच मागितल्याच्या १५५ तक्रारींवरून गुन्हे दाखल झाले असून तब्बल २२३ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नाशिक विभागात १२६ सापळय़ात १७८ जणांना अटक करण्यात आली.

तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद आहे. येथे १२२ सापळे रचून १५७ जणांना अटक केली गेली. नागपूर विभागात ७४ सापळय़ात १०१ जणांना अटक करण्यात आली.

पोलीस-महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्ट

पोलीस आणि महसूल विभागात सर्वाधिक लाचखोर असल्याची नोंद आहे. पोलीस विभागातील लाचखोरांविरुद्ध १६० सापळे रचण्यात आले. त्यात २२४ आरोपींना अटक करण्यात आली. महसूल विभागातील १७५ प्रकरणात २४६ जणांना अटक करण्यात आली. मात्र, केवळ रकमेचा विचार केल्यास सर्वाधिक लाचेची रक्कम पोलीस विभागाने मागितली आहे.

राज्यात १०३३ लाचखोरांवर कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२२ मध्ये राज्यात ७२० प्रकरणे दाखल केली. यामध्ये १०३३ लाचखोरांना अटक करण्यात आली. लाचखोरांमध्ये ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांची संख्या ७६ असून सर्वाधिक तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा (५६२) समावेश आहे. १२३ अधिकाऱ्यारी वर्ग दोनचे आहेत.

आकडे काय सांगतात?

शहर सापळे लाचखोर

पुणे – १५५ २२३

नाशिक १२६ १७८

औरंगाबाद १२२ १५७

ठाणे ८४ १२६

नागपूर ७४ १०१

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments