२० डिसेंबर
जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करीत असलेल्या राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांना पूर्णपुणे क्लीन चिट दिली आहे. एसीबीने उच्च न्यायालयात यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. याआधी एसीबीने जलसिंचन घोटाळ्याशी संबंधित उघड चौकशीची नऊ प्रकरणे बंद करण्यास मंजुरी दिली होती. त्यावेळी एसीबीने ही सर्व प्रकरणे अजित पवार यांच्याशी संबंधित नसल्याचा दावा केला होता.
२१२ निविदा प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे, २१२ पैकी २४ प्रकरणांची नोंदणी करण्यात आली आहे. या २४ प्रकरणांपैकी ५ प्रकरणावंर आरोपपत्र दाखल करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यांपैकी पुरावे नसल्याने ४५ निविदांची चौकशी बंद करण्यात आली आहे. यांपैकी एकूण ९ केसेस बंद करण्यात आली आहेत ,यातील कोणत्याही प्रकरणांशी अजित पवार यांचा काही संबंध नसल्याचे एसीबीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र, आणखी काही माहिती समोर आल्यास, तसेच जर न्यायालयाने त्याबाबत काही आदेश दिल्यास या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते असे एसीबीने म्हटले आहे.
७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लिन चीट दिली आहे. एसीबीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे हे स्पष्ट झाले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.