Thursday, September 28, 2023
Homeउद्योगजगतफ्लिपकार्ट विकणार ऑनलाइन भाजी आणि फळं

फ्लिपकार्ट विकणार ऑनलाइन भाजी आणि फळं

१८ जानेवारी २०२०,
भारतातील ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ऑनलाइन भाजी आणि ताजी फळं विकण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद येथून या पायलट प्रोजेक्टला सुरुवात होणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लवकरच ऑनलाइनद्वारे घरोघरी भाजी आणि फळं विक्री केली जाणार आहे.

‘इकनॉमिक टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भाजीपाल्याची डिलिव्हरी करण्यासाठी फ्लिपकार्ट कंपनी त्यांच्या मार्केट प्लेसवर वेंडर्सशी भागीदारी करणार आहे. त्यासाठी फ्लिपकार्टने लायसन्स मिळवण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. कंपनीने वेकूल फूड अँड प्रॉडक्ट्ससोबतही भागिदारी केली आहे. ताजी फळं आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्याची चेन आणि रेग्युलेटरी कंप्लायन्समधील गुंतागुंतीमुळे फ्लिपकार्ट्सने आतापर्यंत ऑनलाइन भाजी विक्री सुरू केली नव्हती.

अॅमेझॉनकडून काही ठराविक ठिकाणीच फळं आणि भाजीपाल्याची डिलिव्हरी केली जाते. ही स्पेस भरून काढण्यासाठीच फ्लिपकार्टने ऑनलाइन भाजी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. किराणा सामान आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. सध्या हैदराबादमध्ये हा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येत आहे. या पायलट प्रोजेक्टद्वारे ग्राहकांचा स्वभाव आणि सप्लाय चेन याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments