Saturday, December 9, 2023
Homeताजी बातमीस्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडवर पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे..

स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडवर पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे..

स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील दहा बीआरटी मार्गांवरही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांना मदत होणार आहे. वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वेगाची नोंद करण्याकरिता १६ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा क्रमांक आणि वेगाची नोंद या कॅमेऱ्यांद्वारे करण्यात येत आहे.

शहरातील वाहतूक कोंडी होणाऱ्या २३ ठिकाणीही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याद्वारे वाहनांची माहिती संकलित करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग सुरू होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. वाहनांचे क्रमांक ओळखणारा ‘एएनपीआर’ कॅमेराही बसविण्यात आला आहे. त्याद्वारे निगडीतील केंद्रातून पोलीस या कॅमेऱ्याच्या मदतीने रस्त्यावर लक्ष ठेवून नियम मोडणाऱ्यांना दंड आकारणार आहेत. याने गुन्हेगारांची छायाचित्रे घेण्यात येणार आहेत. संबंधित गुन्हेगारांची माहिती त्या परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविली जाणार आहे.

प्रकल्पाला अडथळा करणाऱ्यांवर गुन्हे

स्मार्ट सिटी मार्फत सुरू असलेले अनेक प्रकल्प पूर्ण झाले. काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प शहराच्या नावलौकिकात भर घालणारे ठरतील मात्र, विकास प्रकल्प सुरू असताना अनेक समस्यांचा सामना प्रशासनाला करावा लागतो. त्यामुळे विकासात बाधा निर्माण होते. विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments