Saturday, March 2, 2024
Homeताजी बातमीभाजपाला पहिला झटका भोसरीमधून नगरसेवक वसंत बोराटे यांचा राजीनामा…

भाजपाला पहिला झटका भोसरीमधून नगरसेवक वसंत बोराटे यांचा राजीनामा…

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग रचना जाहीर होताच भाजपचे धाबे दणालले. निवडणुकीच्या तोंडावरच सत्ताधारी भाजपला झटके बसायला सुरुवात झाली. पहिला झटका शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीतून बसला आहे. प्रभाग क्रमांक दोन मोशी-जाधववाडी भागाचेप्रतिनिधित्व करणारे वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रभागाच्या विकासासाठी सहकार्य केले नाही आणि पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता असे सांगत वसंत बोराटे यांनी आज(बुधवारी) महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपला पहिलाझटका बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments