Sunday, February 15, 2026
Homeताजी बातमीचिखली परिसरात किरकोळ कारणावरून गोळीबार

चिखली परिसरात किरकोळ कारणावरून गोळीबार

चिखली परिसरात दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाला. यामध्ये एक मित्र जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 12) रोजी सायंकाळी घडली. अजय सुनील फुले असे जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अजय आणि त्याचा मित्र हे चिखली परिसरात गॅस रिफिलिंगचे काम करतात. त्यांच्यामध्ये रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून मित्राने अजय फुले याच्यावर गोळीबार केला. यामध्ये अजय जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments