पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग लागल्याची घटना पहाटे घडली . पहाटे दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
या आगीत १० लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आला आहे. महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, मोठे नुकसान झाले आहे.