Sunday, July 20, 2025
Homeबातम्याशाहूनगर येथील आर्यनम सोसायटीत आग

शाहूनगर येथील आर्यनम सोसायटीत आग

शाहूनगर, चिंचवड येथील आर्यनम सोसायटीमध्ये एका सदनिकेत आग लागली. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी (दि. 20) दुपारी सव्वा एक वाजताच्या(Chinchwad) सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला गुरुप्रसाद कनूजीअर यांनी शाहूनगर येथे आग लागल्याची वर्दी दिली. त्यानुसार चिखली उपकेंद्राचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. आवश्यकतेनुसार पिंपरी अग्निशमन पथक, प्राधिकरण आणि तळवडे उपकेंद्राच्या पथकांना बोलावण्यात आले.

आर्यनम सोसायटी येथील दुसऱ्या मजल्यावर एका घरात आग लागली होती. त्यामुळे सोसायटीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. जवानांनी घरातून धूर बाहेर काढून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी किचनमध्ये दोन सिलेंडर होते. जवानांनी दोन्ही सिलेंडर सुरक्षित ठिकाणी हलवले. आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. एका तासात आग विझवण्यात जवानांना(Chinchwad) यश आले.

सब ऑफिसर बाळासाहेब वैद्य, गौतम इंगवले, लीडिंग फायरमन शहाजी कोपनर, विकास नाईक, संपत गौड, संजय महाडिक, चालक अमोल खंदारे, चालक दत्तात्रय रोकडे, फायरमन नवनाथ शिंदे, शाम खुडे, अनिल माने, ट्रेनी फायरमन विशाल चव्हाण, जगदीश पाटील, विनायक बोडरे यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments