Thursday, January 16, 2025
Homeताजी बातमीअजित पवारांना अर्थ, धनंजय मुंडेंना कृषी तर वळसे पाटलांना सहकार, दादांच्या ९...

अजित पवारांना अर्थ, धनंजय मुंडेंना कृषी तर वळसे पाटलांना सहकार, दादांच्या ९ मंत्र्यांना वजनदार खाती..

अखेर आज खातेवाटपाला मुहूर्त मिळाला आहे. अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना सगळी वजनदार खाती मिळालेली आहेत. शिंदे गटातील मंत्री आमदारांच्या विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलेलं आहे. तर दिलीप वळसे पाटील यांना महत्त्वाचं मानलं जाणारं सहकार खाते देण्यात आलेले आहे. दुसरीकडे मराठवाड्याच्या अब्दुल सत्तार याच्याकडे असलेलं कृषी खातं काढून घेऊन ते फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलंय. तर आदिती तटकरे यांना अपेक्षेप्रमाणे महिला आणि बालकल्याण खाते मिळालेले आहे.

अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचा समावेश सरकारमध्ये झाला असला, तरी या विस्ताराला दोन आठवडे उलटूनही नव्या मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नव्हते. महत्त्वाच्या खात्यांसह पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्ष सुरू होता. पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात तर उघड संघर्ष होता. त्यामुळे खातेवाटपाला विलंब होत होता. मात्र एकनाथ शिंदे-अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर खातेवाटपाचा तिढा सुटला.

मुख्यमंत्र्यांकडे किती खाती राहिली?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडेच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

  • इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
  • छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
  • राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
  • सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
  • चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
  • गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  • संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
  • धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
  • सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
  • संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय रविंद्र सामंत- उद्योग
  • प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
  • अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
  • दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
  • अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  • कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
  • संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
  • मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
  • अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणकोणती खाती मिळाली?
अजित पवार यांना अर्थखातं, छगन भुजबळ हे आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, दिलीप वळसे पाटील यांना सहकार खातं, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य, धनंजय मुंडे हे आता कृषी मंत्री असतील, धर्मराव बाबा अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन खातं देण्यात आलं आहे. तर आदिती तटकरे या महिला आणि बालविकास मंत्री आहेत. अनिल पाटील यांना मदत आणि पुनर्वनसन तसंच आपत्ती व्यवस्थापन खातं देण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments