Tuesday, March 18, 2025
Homeआरोग्यविषयकअखेर अहवाल आला… दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या ‘तो’ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

अखेर अहवाल आला… दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या ‘तो’ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाची परिस्थिती पूर्व पदावर येत असतानाचा ओमिक्रॉन विषाणूंच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. शहरात वीस दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतूनपुण्यात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आफ्रिकेतून आलेल्या या प्रवाश्यावर महानगर पालिकेने विशेष लक्ष दिले होते. त्या नागरिकाला घरीच विलगीकरनात ठेवण्यात आले होते.

केवळ कोरोना पॉझिटिव्ह
सद्यस्थितीला या नागरिकाचा केवळ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्यात नवीन ओमिक्रॉन विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करावे लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

केवळ दक्षिण आफ्रिकेतीलचा नव्हे तर हॉंगकॉंग, ऑस्ट्रिया, झिंम्बाब्वे, जर्मनी, ईस्त्राईल यासारख्या देशातून शहरात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम महानगरपालिकेने सुरु केले आहे. ओमिक्रॉन विषाणूचा वाढत धोका लक्षात घेत महापालिकेकडून ही खबरदारी घेतली जात आहे.

यासाठीविमानतळ प्रशासनाकडून पुण्यात या देशातून आलेल्या नागरिकांची माहिती मागविली आहे.विषाणू आढळल्या देशातून पुण्यात येण्यासाठी थेट हवाई वाहतुकीची सोया नाही. त्यामुळे ज्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागरिक शहरात परतले आहेत त्याची माहिती जमावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. सद्यस्थितीला शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आता असली तरी दिवाळीनंतर या संख्येत वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments