Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीअखेर शेवंता येणार… ! पहा तिची पहिली झलक

अखेर शेवंता येणार… ! पहा तिची पहिली झलक

२ एप्रिल २०२१,
झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांची आतुरता वाढवणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुरु होऊन काही दिवस लोटले आहेत. मात्र सर्व प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय ती म्हणजे शेवंताला पाहण्याची. या मालिकेच्या आधीच्या भागात अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे मालिकेच्या तिसऱ्या भागात शेवंताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

यातच झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेवंता कधी भेटीला येणार हे सांगण्यात आलं आहे. झी मराठीने शेवंताच्या डोळ्यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती कधी येणार हे सांगण्यात आलं आहे. मात्र यासाठी हा फोटो निरखून पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही हा फोटो निरखूवन पाहिलात तरच तुम्हाला शेवंता कधी येणार हे जाणून घेता येणार आहे. झी मराठीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.”शेवंता येणार पण कधी ते जाणून घेण्यासाठी फोनचा brightness वाढवा.” तर तुम्हाला फोनता ब्राईटलेस वाढवल्यावर कळेल शेवंता कधी येतेय.

या फोटोचा ब्राईनेस वाढलल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलचं. तसचं शेवंताच्या अनेक फॅन्सचा हिरमोड झाला असेल. कारण या फोटोतून एप्रिल फूल बनवण्यात आलं आहे. त्यामुळे शेवंता येण्याचा नेमका दिवस प्रेक्षकांना अजून कळालेला नाही.

असं असलं तरी शेवंता लवकच चाहत्यांच्या भेटीला या मालिकेतून येणार आहे. कारण शेवंतानेच म्हणजेच अपूर्वा सुभेदारने तिच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना ती येत असल्याचं सांगितलं आहे. इतकचं नाही तर मालिकेमध्ये शेवंताची एक झलकही चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. पांडूला आरश्यामध्ये शेवंता दिसली आहे. त्यामुळे लवकरच येत्या भागात शेवंता प्रत्यक्ष भेटीला येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments