Tuesday, January 13, 2026
Homeताजी बातमीअखेर प्रवेश निश्चित ? माजी नगरसेवक राहुल कलाटे आज भाजपमध्ये दाखल होणार

अखेर प्रवेश निश्चित ? माजी नगरसेवक राहुल कलाटे आज भाजपमध्ये दाखल होणार

माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपमधील अंतर्गत विरोधामुळे हा प्रवेश काही काळासाठी लांबला होता, अशी माहिती समोर येत आहे. आता हे सर्व अडथळे दूर झाल्याने आज राहुल कलाटे हे आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असून, त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रवेशामुळे भाजपची शहरातील ताकद अधिक बळकट होणार असून, आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राहुल कलाटे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तीन वेळा निवडणूक लढवत प्रत्येक वेळी विजयी उमेदवाराला तगडे आव्हान दिले. त्यांनी मिळवलेले मताधिक्य आणि मजबूत जनाधार शहरभर चर्चेचा विषय ठरला होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात कलाटे यांचे प्रभावी संघटनात्मक जाळे आहे.

दरम्यान, कलाटे यांचे अनेक समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आज होणारा अधिकृत प्रवेश हा केवळ औपचारिकता मानली जात आहे. विशेषतः वाकड प्रभाग क्रमांक २५ मध्ये या प्रवेशाचा मोठा राजकीय परिणाम होण्याची शक्यता असून, तेथील इच्छुक उमेदवारांच्या राजकीय गणितांवर याचा थेट परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राहुल कलाटे यांचा राजकीय प्रवास शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भारतीय जनता पार्टी असा राहिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, भाजपसाठी हा प्रवेश ‘गेमचेंजर’ ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश पक्षाला निश्चितच मोठे बळ देणारा ठरेल, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments