काल बुधवारी (दि. १६) रोजी वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता आणि आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी ( दि. १७) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, कविता आल्हाट आदी उपस्थित होते.
अचानक राजीनामा दिल्याने भोसरी मतदारसंघात खळबळ उडाली होती. त्यांच्या राजीनाम्याबद्दल आमदार लांडगे यांनी समजूत काढण्याचा आम्ही प्रयत्न करु मात्र, तसे न झाल्यास भाजपाकडे त्या प्रभागातून अनेक पर्याय उपलब्ध असल्याचा इशारा दिला होता. मात्र बोराटे यांनी बंधन झुगारून अखेर हातावर घड्याळ बांधले आहे..