Saturday, April 11, 2026
Homeताजी बातमीविधानसभा मतदारसंघासाठी आज १० नामनिर्देशन अर्ज दाखल व ३० नामनिर्देशन अर्जांची विक्री

विधानसभा मतदारसंघासाठी आज १० नामनिर्देशन अर्ज दाखल व ३० नामनिर्देशन अर्जांची विक्री

विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २८/१०/२०२४ रोजी विहित वेळेत पाचव्या दिवशी एकुण १९ व्यक्तींनी निगडी येथील २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन एकुण ३० नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील :- अश्विन प्रदीप खुडे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडी), मयूर सुभाष गायकवाड (महाराष्ट्र मजूर पक्ष), धर्मराज अनिल बनसोडे, विशाल नंदु वाघमारे, राजू सुदाम भालेराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अँड.गौतम प्रल्हाद कुडुक, कृष्णा प्रल्हाद कुडुक, शुभम अनिल अडागळे, महेंद्र लक्ष्मण सरवदे (वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र मानसिंग छाजछीडक (राष्ट्रवादी वाल्मिकी सेना,भा.रा.जनता पार्टी यांची रा.संयुक्त आघाडी ), कैलास नारायण खुडे, अँड.गोरक्ष जाकाराम लोखंडे (नॅशनल कॉंग्रेस पार्टी (NCP), चेतन प्रकाश दुधाळ, किरण पांडुरंग लोंढे, अँड.सुधीर हिंदुराव कांबळे, अँड.मुकुंद आनंदा ओव्हाळ, मयूर भरत जाधव, सुंदर मसुकांत कांबळे, बाबासाहेब किसन कांबळे यांनी एकूण ३० नामनिर्देशन अर्ज नेल्याचे कळविले आहे.

तसेच आज ७ उमेदवारांनी एकुण १० नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत ते पुढील प्रमाणे -१)सुधीर लक्ष्मण जगताप-अपक्ष, २)सचिन महिपती सोनावणे-अपक्ष, ३)राजू सुदाम भालेराव – महाराष्ट्र नवनिर्माण सेना -१ अर्ज,अपक्ष १ अर्ज, ४)अण्णा दादु बनसोडे -राष्ट्रवादी कॉग्रेस,अजित पवार- ३ अर्ज, ५)चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे – अपक्ष, ६)बाबासाहेब किसन कांबळे, ७)दादाराव किसन कांबळे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली असून आज अखेर एकूण ९ उमेदवारांनी १२ नामनिर्देशन अर्ज दाखल करणेत आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments