Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीशालेय फि पन्नास टक्के माफ करा; फि माफी नाकारणा-या शालेय संस्थांवर कारवाई...

शालेय फि पन्नास टक्के माफ करा; फि माफी नाकारणा-या शालेय संस्थांवर कारवाई करा-सचिन साठे

८ जुलै २०२१,
कोरोना महामारी लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून लाखो नागरीक बेरोजगार झाले आहेत. बहुतांशी पालक आपल्या पाल्यांची शैक्षणिक फि देखिल भरु शकत नाहीत. पालकांच्या प्रचंड दबावानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांनी खाजगी शिक्षण संस्थांनी पंधरा टक्के फि कमी घ्यावी असा आदेश काढला. हे पुरेसे नसून सर्व विद्यार्थ्यांची पन्नास टक्के फि कमी घ्यावी तसेच मागील वर्षीच्या घेतलेल्या फिचा परतावा द्यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकाव्दारे केली आहे.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन पालक व विद्यार्थ्यांकडे फि भरण्याबाबत तगादा लावणा-या शिक्षण संस्थांवर कडक कायदेशीर कारवाई प्रशासनाने करावी. सद्य स्थितीत ऑनलाईन वर्ग सुरु झाले आहेत. परंतू फि बाकी असणा-या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून ऑनलाईन वर्गाची लिंक पाठवली जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशाही शिक्षण संस्थांवर देखिल कायदेशीर कारवाई मनपा आयुक्तांनी करावी अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments