Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयकडॉ. भारती चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मानिनी फाऊंडेशन एक लाख मास्क वाटणार

डॉ. भारती चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मानिनी फाऊंडेशन एक लाख मास्क वाटणार

८ जुलै २०२१,
मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, महाराष्ट्र व गोवा ॲन्टीकोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मानिनी फाऊंडेशन व गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या वतीने महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये एक लाख मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती मानिनी फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा कल्याणी कोटूरकर, सचिव सुनिता शिंदे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

मागील दिड वर्षापासून कोरोनाचा सामना करीत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय, आरोग्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलिस, प्रशासन, वीज पाणी पुरवठा विभागातील कर्मचा-यांनी धोका पत्करुन सेवा केली आहे. वेळ प्रसंगी या कर्मचा-यांना सुरक्षा साधनेही उपलब्ध झाली नाहीत. यामध्ये अनेक कर्मचा-यांचा, त्यांना कुटूंबातील सदस्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू देखिल झाला आहे. या कर्मचा-यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा त्यांना भेटून त्यांचा उचित गौरव करणे आणि त्यांना योग्य व्यासपिठ उपलब्ध करुन देऊन कोरोना महामारीच्या काळातील त्यांचे अनुभव सर्वांपुढे आणून जनजागृती करण्यात येणार आहे.

डॉ. भारती चव्हाण यांनी मानिनी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार, कौटूंबिक अत्याचार या क्षेत्रात अल्पावधीतच उल्लेखनिय काम केले आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील त्यांचे हे कार्य आता देशभर विस्तारीत आहे. पिंपरी चिंचवड कामगार नगरीत त्यांनी गुणवंत कामगारांचे संघटन कामगारांचे तळागाळातील कामगारांना न्याय देण्याचे काम डॉ. चव्हाण करीत आहेत. ॲन्टीकोरोना टास्क महाराष्ट्र व गोव्यातील दिड लाखांहून जास्त कुटूंबांना किराणा किट, औषधे आणि उपचारांसाठी सहाय्य मिळवून दिले आहे. या जुलै महिन्यात डॉ. भारती चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मानिनी फाऊंडेशन, गुणवंत कामगार परिषद, ॲन्टीकोरोना टास्क फोर्सचे पदाधिकारी महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना प्रत्यक्ष भेटून एक लाख ट्रिपल लेअर मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. ज्या संस्थांना मोफत ट्रिपल लेअर मास्क वाटण्यासाठी पाहिजे असतील त्यांनी कल्याणी कोटूरकर – 9518586277, सुनिता शिंदे – 9130237423 किंवा अर्चना – 9561880176 यांच्याशी व्हॉटस्‌अपवर संपर्क साधावा असेही आवाहन मानिनी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments