Wednesday, June 19, 2024
Homeगुन्हेगारीतलावात बस कोसळून भीषण अपघात; 17 जणांचा जागीच मृत्यू

तलावात बस कोसळून भीषण अपघात; 17 जणांचा जागीच मृत्यू

बस तळ्यात कोसळल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सतरा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 35 जण गंभीर जखमी झाले आहेत.

बांगलादेशमधून मोठी बातमी समोर आली आहे. बस तळ्यात कोसळल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सतरा लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. तर या अपघातामध्ये 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी दुपारी बांगलादेशातील छत्रकांडा परिसरात घडली आहे. चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या बसमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी होते अशीही माहिती समोर आली आहे.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ही बस बशर स्मृती परिवहनची होती. या बसची क्षमता 52 प्रवाशांची असताना देखील या बसमधून 60 प्रवासी प्रवास करत होते. ही बस शनिवारी सकाळी नऊ वाजता पिरोजपूरवरून भंडरियाकडे निघाली होती. त्यानंतर ही बस बरिशाल -खुलना राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना हा अपघात झाला. बस तळ्यात कोसळली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा अशी माहिती समोर येत आहे.

धोकादायक स्थितीमध्ये प्रवास

या अपघातातून वाचलेल्या प्रवाशानं अपघाताबाबत माहिती देताना म्हटलं की या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरलेले होते. लोक धोकादायक स्थितीमध्ये प्रवास करत होते. मी याबाबत चालकाशी बोललो देखील, त्यानंतर काही वेळातच बस महामार्गावर अचानक खाली उतरली आणि तळ्यात पलटी झाली. या अपघातामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments