२१ डिसेंबर
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी घोषणेची प्रतिक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती. आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. शेतकऱ्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कर्जे माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या काही ठळक बाबी
शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ,
या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये CMO कार्यालय सुरु करणार. ते कार्यालय थेट मंत्रालयातील CMO कार्यालयाला जोडलेलं असेल.
गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार.
सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही.
विदर्भात १२३ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे.
गोसी खुर्द प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करणार.
यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार.
आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवशी होता,राज्यसरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष होते.