Thursday, February 6, 2025
Homeमुख्यबातम्याशेतकऱ्यांचा नादखुळा टोमॅटोने लखपती झालेल्या शेतकऱ्यांनी लावले फ्लेक्स, नाशिक जिल्ह्यात एकच चर्चा

शेतकऱ्यांचा नादखुळा टोमॅटोने लखपती झालेल्या शेतकऱ्यांनी लावले फ्लेक्स, नाशिक जिल्ह्यात एकच चर्चा

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात सध्या टोमॅटो उत्पादकांपेक्षा टोमॅटो उत्पादकांनी लावलेल्या बॅनरची जास्त चर्चा आहे. राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी अथवा भावी उमेदवारांनी वाढदिवसाचे सण – उत्सवांचे, राजकीय पदावरील निवडीचे लावले बॅनर आपल्या कुठल्याही कोपऱ्यात दिसतात. बऱ्याच वेळा एखाद्या बॅनर वरील आशय लक्ष वेधून घेणारा असतो. अशाच पद्धतीने नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात लावलेला बॅनर अधिक लक्षवेधी ठरत आहे.

हा बॅनर धुळवड गावच्या लखपती असलेल्या शेतकऱ्यांनी लावला आहे. यातील शेतकरी गर्भ श्रीमंत आहेत अशातलाही भाग नाही. कायमच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला आता टोमॅटोच्या दरामुळे सुगीचे दिवस आले आहेत. टोमॅटोची लाली ही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देणारी ठरली आहे. आपल्या शेतातील पिके निसर्गाच्या भरवश्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाने कायम निराशा दाखवली आहे. परंतु यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना निसर्ग आणि बाजाराने साथ दिल्याने धुळवड गावच्या शेतकऱ्यांना जणू लॉट्रीच लागली आहे.

आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे कष्टाने घामाने टोमॅटोच्या पिकाला सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला टोमॅटोच्या बाजारभावातून यंदा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जवळपास १२ शेतकरी ‘कोट्याधीश’ तर ५५ जणांनी ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर इतर छोटे शेतकरीही ‘लखपती’ झाले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी लॉटरी लागल्याप्रमाणेच आपला आनंदोत्सव साजरा करत आहेत. या आनंदातून धुळवड गावात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी बॅनर लावला आहे. हे बॅनर सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे. “होय आम्ही करोडपती- लखपती धुळवडकर”, असा मजकूर लिहिलेला बॅनर लक्षवेधी ठरत आहे.

या बॅनरवर टोमॅटो उत्पादनातून धुळवड गावच्या बळीराजांने भरघोस उत्पन्न मिळवल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन “होय आम्ही करोडपती धुळवडकर, आम्ही लखपती धुळवडकर” शुभेच्छुक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य धुळवड, अशा पद्धतीचा आशय असून या बॅनरची सध्या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

कवडीमोल भावात विकला जाणारा टोमॅटो सुरुवातीला ५० रुपये प्रति क्रेटने विकला गेला एका क्रेटची क्षमता २० किलो टोमॅटोची आहे. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो सुमारे १५० ते २०० रुपये दर मिळाला आहे. एकूणच २० किलोची एक क्रेट सुमारे २१००-२००० रुपयाने विकला जात आहे. काही शेतकऱ्यांना एकरी १०-१२ लाखांचे तर काहींना ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments