Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट… !

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट… !

२२ ऑक्टोबर २०२०,
पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते असल्याचे समोर आले असून यापासून सावध राहा असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कृष्ण प्रकाश नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मात्र, त्यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक होऊ शकते हे नाकारता येत नसल्याने त्याच्या पासून नागरिकांनी सावध राहावे अस लोकसत्ता ऑनलाईन शी बोलताना त्यांनी म्हटलं आहे.

आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची सूत्रे हातात घेतल्या पासून विविध कारवाई चा धडाका पोलीस अधिकाऱ्यांनी लावला आहे. ते आल्यापासून शहरातील अवैद्य धंद्यांवर जरब बसला असून त्यासाठी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना त्यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या नावाने फेसबुकसह इतर काही बनावट खाते असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांच्या नावावर सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, बनावट फेसबुक प्रकरणी संबंधितांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले असून नागरिकांनी जागरूक राहावे असे आवाहन केले आहे.

विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींचे फॅन्स त्यांच्या नावाने असले उद्योग करीत असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. काही जण थेट अमुक व्यक्ती आणि फॅन्स क्लब असे अकाऊंट सुरू करून त्यावर संबंधितांचे फोटो – माहिती अपलोड करीत असतात. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावानेही फेसबूकवर अनेक अकाऊंट आहेत. त्यातील कोणती खरी आणि कोणती खोटी हे ओळखणे सामान्य नागरिकांना अवघड आहे.

नागरिकांशी तत्काळ संपर्क व्हावा. नागरिकांना सर्व प्रकारे संपर्क साधता यावा तसेच एकदा मुद्दा माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अनेक अधिकारी सोशल मीडियाचा वापर करतात. पण अशा प्रकारे जर पैसे मागण्याचे प्रकार घडत असतील तर ते धक्कादायक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments