Thursday, May 15, 2025
Homeगुन्हेगारीआयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट,सायबर सेलकडे तक्रार

आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट,सायबर सेलकडे तक्रार

१० जून २०२१,
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून लोकांकडून पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.

महापालिकेचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी या संदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्यांच्याशी संबंधितांना पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठविले जात आहेत. बऱ्याच लोकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावानेही असेच बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अनेकांकडे पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला होता. त्यात आता महापालिका आयुक्तांच्याही बनावट अकाउंटचा प्रकार समोर आला आहे. आयुक्तांच्या नावाने फेसबुकवर अकाउंट तयार करून लोकांकडून पैसे मागण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले होते. मात्र, आता ते बंद करण्यात आले आहे. बनावट प्रोफाइल करणाऱ्याने पैशाची मागणी केली आहे. त्याला कोणी पैसे पाठवले आहेत का, याची माहिती घेण्यात येत आहे. फेसबुककडूनही माहिती मागविण्यात येणार आहे.

  • संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments