Sunday, September 8, 2024
Homeताजी बातमीफडणवीसांचं राजकारण अहंकाराचे दुश्मनीचं, कधीतरी अंत होणारच -आमदार रवींद्र धंगेकर

फडणवीसांचं राजकारण अहंकाराचे दुश्मनीचं, कधीतरी अंत होणारच -आमदार रवींद्र धंगेकर

भाजपचं कसब्यावर २८ वर्षांचं अधिराज्य मोडून काढत रवींद्र धंगेकरांनी विजयी किल्ला सर केला. हेमंत रासने यांना तब्बल ११ हजार मतांनी धूळ चारुन धंगेकरांनी विधानसभेत पाऊल ठेवलं. यानंतर त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसावर टीका केली . या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची चिरफाड केली. गेल्या १० वर्षात महाराष्ट्रातील खालावलेल्या राजकीय स्तरावर बोट ठेऊन त्याला सर्वस्वी फडणवीस जबाबदार असल्याचा घणाघात रवींद्र धंगेकर यांनी केला.

आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची आणि राजकीय नेत्यांची परंपरा आहे पण देवेंद्र फडणवीस याला अपवाद आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण कुरघोडीचं, दुश्मनीचं आणि दबावाचं आहे. विरोधकांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करायचं हाच अजेंडा घेऊन फडणवीस काम करतात. लोकशाहीची हत्या कशी करतात ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं. आज जरी असं राजकारण त्यांना चांगलं वाटत असेल पण हा क्षणिक आनंद आहे. आज सत्तेत असल्याने लोक त्यांना नमस्कार करतात पण सत्ता गेल्यावर लोक नमस्कार देखील घालणार नाही. फडणवीसांमुळे भाजपची प्रतिमा मलिन झालीये. त्यांच्यामुळे भाजपकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगळा झालाय. त्यामुळे याचा शेवट चांगला होणार नाही, फडणवीस भाजपला रसातळाला घेऊन जातील, असा हल्लाबोल कसब्याचे नवनिर्वाचित काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.

“राजकारणात चढउतार असतो. सदा सर्वदा माणूस सत्तेत बसत नाही. सत्ता गेल्यावरही लोकांनी नेत्याला नमस्कार घातला, तर तो नेता चांगला समजला जातो. जो नेता लोकांमध्ये रमतो, लोकांच्या सुख दु:खात सामील होतो, तो नेता लोकांना भावतो. आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची आणि राजकीय नेत्यांची परंपरा राहिलीये. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरी ते पृथ्वीराजबाबा यांना कुणीही वाईट म्हणत नाही. त्यांच्या माघारीही त्यांच्याबद्दल चांगलं बोलतात. त्यांच्याबदद्ल लोकांमध्ये खूप आदर आहे. पण फडणवीसांबद्दल भीतीचं वातावरण आहे. एखाद्या गुन्हेगाराला कसं आपण घाबरुन नमस्कार करतो तसं हे काम आहे. पण हे राजकारण फार काळ टिकणार नाही. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये”, असं धंगेकर म्हणाले.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील लोक फडणवीसांनी ईडीचा धाक दाखवून भाजपमध्ये नेले. त्यांना शुद्ध करुन घेतलं. पण मतदारराजा हे सगळं बघत असतो. अशा राजकारणाचा कधी ना कधी अंत होत असतो. त्यांनी कितीही पैसा वाटू देत, त्यांनी कितीही खालच्या पातळीला जाऊन राजकारण करु देत पण लोकांना हे कधीच आवडणार नाही. शेवटी कर्तृत्व माणसाला विजयाची नौका पार करुन देतं, चांगलं वाईट समाजाला कळत असतं. सज्जन दुर्जन माणसं समाजाला कळत असतात. फडणवीस ज्यावेळी सत्तेवरुन जातील तेव्हा नमस्कार करायलाही लोक त्यांना भेटणार नाहीत. गडकरी-पवार-ठाकरे सत्तेत नसतील तरी त्यांना महाराष्ट्र आदरपूर्वक नमस्कार करतो पण फडणवीसांच्या राजकारणाच्या शैलीमुळे त्यांना आदराच्या भावनेपेक्षा भीतीतूनच अधिक लोक पाहतात. कालांतराने त्यांचा ह्याचा पस्तावा होईल. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, असं धंगेकर म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments