डोळ्यातून पाणी येणे, घाण येणे, डोळे लाल होणे या आजाराची प्राथमिक लक्षणं दिसून येतायत.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल (Climate Change) होत असल्याने, राज्यातील अनेक भागात डोळ्याची साथ पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठवाड्यातील जालना आणि परभणी (Eye Conjunctivitis in Jalna-Parbhani) या दोन जिल्ह्यात देखील आता डोळ्याची साथ पाहायला मिळतेय. ज्यात माणसांच्या डोळ्यातून पाणी येणे, घाण येणे, डोळे लाल होणे या आजाराची प्राथमिक लक्षणं दिसून येतात. त्यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या नेत्रविभागात रुग्णांची वाढ होतांना दिसत आहे. तर डोळ्याच्या खाजगी रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे.
जालना जिल्ह्यात डोळ्याची साथ…
मागील काही दिवसांपासून जालना शहरात डोळे येण्याची साथ पाहायला मिळत आहे. दरम्यान यात आणखीच वाढ होतांना दिसत आहे. ज्यामुळे डोळ्यांचे रुग्ण झपाटयाने वाढू लागले आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या नेत्रविभागात दररोज 25 ते 30 रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांत वातावरणात सतत बदल होत असल्याने याचे परिणाम माणसांच्या आरोग्यावर देखील जाणवत आहे. ज्यात काही दिवसापासून अनेक ठिकाणी डोळे आलेले रूग्ण आढळून येत असल्याने नागरीकांची चिंता वाढली आहे. जालना शहरात देखील अनेकांना असाच काही त्रास जाणवत आहे. ज्यामुळ डोळ्यांना जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे असे लक्षणे दिसत आहे. तर डोळे येण्याची लक्षणे म्हणजे डोळ्यात लालसरपण येणे, सूज येणे, खाज सुटणे असे लक्षणे दिसत आहे.
परभणीत देखील रुग्णांची वाढ
जालनाप्रमाणेच परभणी (Parbahni) जिल्ह्यात देखील डोळे येण्याचा संसर्गजन्य आजार वाढलेले असून याचे रूग्ण जिल्हा रूग्णालयात दररोज शंभराहून अधिक उपचारासाठी येत आहेत. डोळे येणे हा एकप्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. विशेषत पावसाळयात हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. या आजारालाच पिंक आय असेही म्हटले जाते. कधीकाळी दोन्ही डोळयांवर संसर्ग होवू शकतो. या आलेल्या आजारात डोळयांना खाज, चिकटपणा, सुज येणे, डोळे लालसर पडणे, डोळयातून पिवळा द्रव बाहेर येणे आदी लक्षणे आढळतात. डोळयांचा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी यात नागरिकांनी वैद्यकीय तात्काळ सल्ला घेणे आवश्यक आहे. तर परभणी जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात डोळ्याचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.