पुण्यात सिंहगड हा पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. येथे रोज हजारो पर्यटक भेट देत असतात. मात्र, आता या ठिकाणी जातांना काळजी घ्यावी लागणार आहे. येथे बिबट्या आढळला असून पर्यतकांना याचा धोका आहे.
पुण्यात सिंहगड हा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पावसाळा सुरू झाला की या ठिकाणी जणाऱ्यांची संख्या वाढते. रोज हजारो पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात. मात्र, आता या गडावर जाताना पर्यटकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सिंहगडाच्या घेऱ्यात बिबट्या आणि बछड्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन हे फोटो घेण्यात आले आहेत. गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला आहे.

पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक पर्यटक सिंहगडावर ट्रेकींग किंवा फिरण्याचा आनंद लुटतात. येथे जाणाऱ्या पर्यटकांची सोय व्हावी म्हणून आता पीएमटी तर्फे बस सेवा सुद्धा सुरू केली जाणार आहे. दरम्यान, सिंहगड परिसर हा दाट जंगलाचा परिसर आहे. या ठिकाणी अनेक वन्य प्राणी अस्तित्वात आहेत. त्यात हिंस्त्र प्राणी देखील आहे. येथील घेरा सिंहगड येथे आता बिबट्याचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. वनविभागाने गडावरील मार्गावर जातांना पर्यटकांसाठी बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ठीकठिकाणी बोर्ड देखील लावले आहे. मात्र, आज पर्यंत कधी या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले नव्हते.

मात्र, आता सिंहगडावर जाताना पर्यटकांना हजार वेळा विचार करावा लागणार आहे. सिंहगडाच्या घेऱ्यात बिबट्या आणि बछड्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन हे फोटो घेण्यात आले आहेत. गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला आहे. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये याबाबत नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितली आहे.
वनविभागाने याची दखल घेतली आहे. दरम्यान या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील होत आहे. पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर हा परिसर प्रामुख्याने बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. मात्र, आता बिबट्या पुण्याच्या वेशीवर आल्याने चिंतेत भर पडली आहे.