Thursday, May 15, 2025
Homeताजी बातमीWest Bengal Election: माजी केंद्रीय मंत्री आणि माजी भाजप नेते यशवंत सिन्हांचा...

West Bengal Election: माजी केंद्रीय मंत्री आणि माजी भाजप नेते यशवंत सिन्हांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश


पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय घडामोडी सुरू असल्याचे मागील काही दिवसात दिसून आले. गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ आधी तृणमूल, मग भाजपा आणि नंतर काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर केली आहे. आता एकेकाळी भाजपाच्या कोअर ग्रुपमध्ये गणले जाणारे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राहिलेले यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वयाच्या ८३व्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

एकेकाळी भाजपाच्या थिंक टँकमध्ये यशवंत सिन्हा यांचा समावेश होता. मात्र, पक्षासोबत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे यशवंत सिन्हा यांनी २०१८मध्ये भाजपाला रामराम ठोकला. पण त्यांचा मुलगा जयंत सिन्हा मात्र अजूनही भाजपाकडून कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये ते हवाई वाहतूक राज्यमंत्री देखील होते.

भाजपाला रामराम ठोकल्यापासून यशवंत सिन्हा राजकीय जीवनापासून विलग झाले होते. मात्र आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या ऐन महिनाभर आधी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजकीय तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments