Sunday, May 17, 2026
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवडमध्ये २८ एप्रिलला सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी चिंचवडमध्ये २८ एप्रिलला सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से. क्र. २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे २८ एप्रिलला पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असून २९ एप्रिलला सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.

निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून सहकार्य करावे. देखभाल-दुरुस्तीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील. – प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments