३० नोव्हेंबर २०२०,
राज्यात पहिल्यादांच चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची निर्मिती पुणे पोलिसांनी केली. त्याचे उद्घाटन आय.आय.टी.कानपूरचे डायरेक्टर अभय करंदीकर यांच्या हस्ते करण्यात आले.शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारासोबत त्यांची मुलेही येत असतात. तर काही ठिकाणी लहान मुलांचा वापर करुन चोरीही केली जाते.
शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारासोबत त्यांची मुलेही येत असतात. तर काही ठिकाणी लहान मुलांचा वापर करुन चोरीही केली जाते.तसेच, कुटुंब कलाहामुळे मुलांच्या मनावरही त्याचे विपरीत परीणाम होत असतात. अशी मुले जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात.तेव्हा त्याच्या मनावरील दडपण कमी करण्याकरता चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची निर्मिती ‘होप फॉर द चिल्ड्रन फांऊडेशन’ आणि पुणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

शहरातील लष्कर पोलीस स्टेशनच्या आवारात हे स्टेशन सुरु करण्यात आले. या स्टेशनच्या भिंतीवर विविध कलाकृती साकारुन रंगविण्यात आल्या आहेत.तसेच, खेळणी, खुर्च्या, टेबल, पुस्तकंही ठेवण्यात आली आहेत. या स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून तेच इथे येणाऱ्या मुलांचे मनोधैर्य वाढविणार आहेत.