ब्रिटीश राजघराण्यातील इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं निधन झालं. ते ९९ वर्षांचे होते. त्यांना Duke of Edinburgh म्हणून ओळखले जात होते. प्रिन्स फिलिप यांचा जन्म १० जून, १९२१ रोजी कोर्फू ग्रीक द्वीप येथे झाला होता. राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलीप यांचा विवाह १९४७ रोजी झाला होता. फिलीप हे ब्रिटीश राजघराण्यात सत्तर वर्षे ड्युकपदावर राहिले होते. ब्रिटीश रॉयल नेव्हीत कार्यरत असणारे फिलीप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग असे म्हणूनही ओळखले जाते.
फिलीप यांनी ब्रिटीश राजघराण्यात आधुनिकता आणली होती. राजवाड्यातील अनेक रुढींना आणि प्रथांना त्यांनी उघडपणे विरोध केला होता. फेब्रुवारीत फिलिप यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. नंतर मार्च महिन्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.