Monday, April 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीयIndia vs England : इंग्लंडच्या खेळाडूंनी हातावर का बांधल्या काळ्या पट्ट्या? वाचा

India vs England : इंग्लंडच्या खेळाडूंनी हातावर का बांधल्या काळ्या पट्ट्या? वाचा

भारत आणि इंग्लंड मध्ये चार सामन्यांची कसोटी सीरिज मालिकेत पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या संघाने जेव्हा मैदानावर पाऊल ठेवलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. कारण, इंग्लंडच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. यावर जोरदार चर्चा सुरू झाली. पण नंतर इंग्लंडच्या संघाने शोक व्यक्त करण्यासाठी हे केलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इंग्लंडचे खेळाडू टॉम मूरच्या मृत्यूमुळे सगळ्यांनी ब्लॅक बेल्ट बांधला असल्याचं सांगण्यात येत आहे. कॅप्टन टॉम मूर 100 वर्षाचे होते. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने इंग्लंड अँड वेल्स बोर्डाला दिलेल्या माहितीनुसार, सर कॅप्टन मूर यांचं कुटुंब त्यांच्या कामाबद्दल नेहमीच अभिमान व्यक्त करत असेल. सर्वात कठीण काळातही त्यांनी देशाला हसण्यासाठी कारण दिलं आहे. यामुळे संपूर्ण इंग्लंड संघाच्या वतीने मी त्यांच्या कुटूंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. 

वाचाः Gold Rate Today : आनंदाची बातमी! 6 महिन्यांत सोने 9462 रुपयांनी स्वस्त; आणखी घसरण होण्याचा अंदाज

महायुद्धातील दिग्गज कॅप्टन मूरला कोरोना विषाणूची लागण झाली आणि बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी कॅप्टन मूरचे एक चित्र सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली होती. कॅप्टन मूरने कोरोना काळातील 40 मिलियन म्हणजे सुमारे तीन अब्ज रुपये गोळा करून राष्ट्रीय आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्यांच्या या कामाची सगळ्यांनाच आठवण राहणार आहे.

दरम्यान, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. या पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व राहिलं. इंग्लंडने दिवसखेर 89.3 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 263 धावा केल्या. यामध्ये कर्णधार जो रुटने शानदार कामगिरी केली. रुटने आपल्या 100 व्या कसोटीमध्ये शानदार शतक लगावले. तर डोमिनिक सिब्लीने 87 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉरी ब्रन्सने 33 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो रुट 128 धावांवर नाबाद होता. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने 2 तर रवीचंद्रन अश्विनने 1 विकेट घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments