Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीअतिक्रमण विभागाची वडमुखवाडी भागातील रेड झोन मधील अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई ,...

अतिक्रमण विभागाची वडमुखवाडी भागातील रेड झोन मधील अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई , ४२००७ चौ .फूट बांधकाम पाडले

८ फेब्रुवारी २०२१
मौजे वडमुखवाडी( प्रभाग क्र ३ ) भागातील रेड झोन मधील अनधिकृत बांधकामावर. आज दि ०८ / ०२ / २०२१ रोजी महापालिकेची बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली सदर कारवाई मध्ये सोबत जोडलेल्या यादीनुसार एकूण ३६ अनधिकृत बांधकाम असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ४२००७ चौ .फूट बांधकाम पाडण्यात आली आहेत.

सदर कारवाई मा. अतिरिक्त आयुक्त २ श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , सह शहर अभियंता श्री मकरंद निकम यांचे उपस्थितीत तसेच मा कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राणे यांचे नियत्रंणाखाली उपअभियंता श्री हेमंत देसाई , श्री . सुर्यकांत मोहिते , श्री.सुधीर मोरे तसेच ५ कनिष्ठ अभियंता व एकूण ३५ बीट ऑफीसर तसेच सदर कारवाईसाठी पोलीस विभागामार्फत डी सी पी श्री सुधीर हिरेमठ पी आय श्री मोहन शिंदे, श्री प्रकाश जाधव, श्री शिवाजी गवारे , ४ पी एस आय व ४२ पोलीस कर्मचारी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई साठी ३ पोकलेन , ५ जेसीबी , २५ मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री अजित पवार यांनी सदर ठिकाणी दि० ९ / २/ २०२१ रोजी देखील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार असुन सदर बांधकाम धारकांना बांधकाम काढून घेण्याचे व होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments